Bhagyshri Atram : पवारांच्या घरफोडीला काँग्रेसचाच खोडा; वडेट्टीवार म्हणाले, भाग्यश्री अत्राम करतील धर्मरावबाबांचा विजय सोपा!!

Bhagyshri Atram

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Bhagyshri Atram शरद पवारांनी डाव टाकला, त्यांनी खेळी केली, पवारांचा मास्टर्स स्ट्रोक वगैरे भलामणी भाषेतून पवारांच्या घरफोड्यांचे समर्थन करणाऱ्या त्यांच्या समर्थकांना आणि मराठी माध्यमांना काँग्रेसमधूनच एक तडाखा बसला आहे. Bhagyshri Atram

पवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातले प्रभावी अत्राम हे राजकीय घराणे फोडून धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी देण्याचा घाट काँग्रेसने उधळून लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो देखील काँग्रेसच्या कुठल्या स्थानिक किंवा लहान नेत्याने नव्हे, तर थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाग्यश्री आत्राम यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. यातून वडेट्टीवारांनी पवारांच्या घरपोडीलाच खोडा घातला आहे. Bhagyshri Atram



धर्मरावबाबांचा अहेरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी पवारांनी त्यांचे घर सोडून त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम हिला आपल्या पक्षात घेऊन तिची तुतारी चिन्हावर उमेदवारी परस्पर जाहीर केली. पण आता विजय वडेट्टीवार यांनी भाग्यश्री यांच्या उमेदवारीला विरोध केला. भाग्यश्री आत्राम जास्तीत जास्त 10 ते 15 हजार मते घेऊ शकतील. त्यापलीकडे त्यांची झेप जाणार नाही. अहेरी मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणूक लढवली पाहिजे, तरच धर्मरावबाबा अत्राम यांचा पराभव करता येणे शक्य होईल, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी पवारांना हाणला आहे. Bhagyshri Atram

मूळात धर्मरावबाबांचा विजय सोपा होण्यासाठीच भाग्यश्री अत्राम यांनी धूर्तपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याचा गौप्यस्फोट वडेट्टीवारांनी केला आहे. भाग्यश्री आत्राम यांच्या खेळीची पूर्ण माहिती महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र पवारांच्या राष्ट्रवादी कडून वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर कुठलाही खुलासा अद्याप झालेला नाही. Bhagyshri Atram

Congress opposed Bhagyshri Atram candidature of NCP SP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात