प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात जो राजकीय करिष्मा दाखविला, त्याचा सध्याचा कळसाध्याय त्यांनी २०२२ मध्ये ठाकरे – पवार सरकार पाडून पूर्ण केला. त्यामुळे त्यांच्या राजकीय करिष्म्याचे सगळेच विशेषतः काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते चाहते बनले. यापैकी फडणवीसांचे दोन चाहते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आले आहेत. सत्यतिज तांबे आणि प्रफुल्ल पटेल हे ते दोन नेते आहेत. congress – ncp leaders shows brotherhood to deputy chief minister devendra fadanavis
विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसने बाहेर काढलेले आणि अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे हे देवेंद्र फडणवीसांना आपले मोठे भाऊ असल्याचे म्हणाले, तर आज प्रफुल्ल पटेल यांनी आपले वय जास्त असल्याने देवेंद्र फडणवीसांना आपले लहान भाऊ म्हणाले आहेत.
भंडारा – गोंदियातील कार्यक्रमात फडणवीस – पटेल – आणि विजय दर्डा एकत्र होते. त्या कार्यक्रमात तिघांच्या भाषणांची राजकीय जुगलबंदी रंगली होती. शिवाय प्रफुल्ल पटेलांबाबत आजच एक बातमी सकाळी मराठी माध्यमांमध्ये आली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी मनी लॉन्ड्रिंग करून बांधलेल्या मुंबईतल्या सीजे हाऊसचे ४ मजले जप्त करण्याच्या कारवाईवर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने शिक्कामोर्तब केल्याची ही बातमी आहे. सीजे हाऊस प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने इक्बाल कासकरच्या जमिनीवर बांधले आहे. आता त्यातली मालमत्ता जप्त झाल्याने प्रफुल्ल पटेल तसेही आज चर्चेत होतेच. त्यातच त्यांचे फडणवीस बंधू प्रेम पण आज उफाळल्याने त्याची वेगळी चर्चा पण सुरू झाली.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कारनामे केले आहेत. ते जिथे जातील, तिथून काहीतरी घेऊन जातात, असे वक्तव्य करून विजय दर्डा यांनी सस्पेन्स वाढविला. तर जिथे फडणवीस – पटेल एकत्र येतात, त्याची चर्चा तर होणारच, असा टोला फडणवीसांनी लगावल्याने त्यांच्या भाषणाचीही चर्चा रंगली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App