विशेष प्रतिनिधी
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने भाजपमधून फोडून पक्षात घेतलेल्या छोटू भोयर यांना “कात्रजचा घाट” दाखवत शेवटच्या दिवशी त्यांची उमेदवारी कापली. आता निवडणुकीतले मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टोलेबाजी सुरू आहे. Congress men and BJP candidate Chandrasekhar Bawankule targets Nana Patole over MLC candidate Change in congress
काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी ऐनवेळी उमेदवार बदलायला लावला. त्यामुळे नाना पटोले हे किती प्रभावहीन प्रदेशाध्यक्ष आहेत हे दिसून आले, अशी टोलेबाजी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातून सुरू आहेच. त्याचबरोबर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाना पटोले यांना टोला हाणून घेतला आहे. काँग्रेसचे दोन मंत्री ऐनवेळेला उमेदवार बदलतात यावरून नाना पटोले यांचा पक्षात काय “स्थान” आहे, हे लक्षात येते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला बरा, असा टोला बावनकुळे यांनी हाणला आहे. भाजपला विधान परिषद निवडणुकीत 318 मते मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे. काँग्रेसचे दोन मंत्री नितीन राऊत आणि सुनील केदार त्यामुळे उमेदवार बदलावा लागला असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे.
याचा अर्थ नाना पटोले यांनी छोटू भोयर यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन भाजपमधून फोडून काँग्रेसमध्ये पक्षात घेतले. पण पक्षाच्या दोन मंत्र्यांनी मात्र त्यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापायला लावले, असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नाना पटोले यांना काँग्रेसमध्ये किंमत नसल्याचे दिसून येते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर आता नाना पटोले काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App