Congress : महायुतीच्या लाडक्या बहिणीविरोधात कोर्टात धाव; पण आता काँग्रेसच खेळणार “महालक्ष्मी” योजनेवर डाव!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर करून लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरुद्ध काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच महालक्ष्मी नावाच्या योजनेवर डाव खेळणार असल्याची बातमी समोर आली. Congress

महायुती सरकारने लोकसभेतील पराभवाचा धडा घेतल्यानंतर महायुती सरकारने महाराष्ट्रात लाडके बहिणी योजना लागू केली. सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यांमध्ये दरमहा 1500 रुपये जमा होऊ लागले. त्याचे राजकीय परिणाम महाराष्ट्रात दिसायला लागल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.

काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. महाराष्ट्राची आर्थिक हालत खस्ता असताना लाडके बहीण योजनेतून राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे संबंधित योजना बंद करायचे आदेश द्यावेत, अशी मागणी अनिल वडपल्लीवार यांनी न्यायालयात केली. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे काँग्रेसचे वाभाडे काढल्यानंतर अनिल वडपल्लीवार आपण काँग्रेसचे कार्यकर्ते असलो, तरी न्यायालयातल्या आपल्या अर्जाशी यांनी त्यामध्ये पक्षाचा काही संबंध नसल्याचा दावा केला, पण म्हणून काँग्रेसने रचलेला डाव झाकून राहिला नाही.

त्या उलट आता काँग्रेसच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेचा समावेश करून त्यावर डाव खेळण्याची बातमी समोर आली. काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीत महालक्ष्मी योजनेतून महिलांच्या खात्यात 2000 रुपये देण्याची आधीच घोषणा केली होती. त्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला होता. आता तोच उल्लेख महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात रिपीट करण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महालक्ष्मी योजनेवर शिक्कामोर्तब केल्याची बातमी माध्यमांनी दिली. Congress

Congress may declare mahalaxmi yojna in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात