वृत्तसंस्था
मुंबई : Maharashtra Congress नुकत्याच झालेल्या हरियाणातील निवडणूक निकालांमुळे काँग्रेस काहीशी तडजोडीच्या स्थितीत आल्याची चर्चा सुरू होती. परंतु सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव सेनेपेक्षा किमान २० जागा जास्त लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. 115 जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. तेथून परतल्यानंतर संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यात 115 जागांची तयारी सुरू झाली. काही उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. प्रचारात पिछाडी टाळण्यासाठी उमेदवारांना तयारीस लागण्याचे गुप्त संदेश एक-दोन दिवसात देण्याचेही या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.Maharashtra Congress
लोकसभेचा निकाल आणि सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेत काँग्रेसने 115 जागांवर दावा केला होता. ऑक्टोबरच्या प्रारंभी मविआची जागावाटप बैठक झाली. त्यातही हाच मुद्दा मांडण्यात आला होता. हरियाणाच्या निकालानंतर उद्धवसेनेने काँग्रेसवर हल्लाबोल केला. जास्त जागा आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी पुन्हा मागणी केली होती.
सूत्रांनी सांगितले की, शरद पवारांनी खासदार संजय राऊत यांना योग्य शब्दात समज दिल्यावर उद्धवसेनेने दोन्ही मागण्यांवरून माघार घेतली आहे. सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात दिल्लीत राहुल गांधींना भेटून आले. त्याविषयी सूत्रांनी सांगितले की, 210 जागांवर मविआतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असले तरी अद्याप राज्यातील सर्वच विभागातील जागांवर एकमत झाले नाही. म्हणून उमेदवारांना प्रचारात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. परिणामी सावधगिरी म्हणून काँग्रेसने अशा सक्षम उमेदवारांवर सोमवारी बैठकीत चर्चा केली. त्यापैकी तिकीट मिळणाऱ्या उमेदवाराला प्रचारास लागण्याचे निरोप देण्यात येणार आहेत.
काँग्रेसकडे 1700 जणांनी अर्ज केले आहेत. एका मतदारसंघात दोन उमेदवार अशी यादी तयार झाली आहे. बहुतांश विद्यमान काही माजी आमदार आणि नव्या चेहऱ्यांचा यादीत समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App