विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना फक्त हिंदुत्वाच्या चष्म्यातून पाहू नका. ते आधुनिक विचारवंत होते. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी फार मोठे काम केले. त्यांचे सामाजिक विचार पुरोगामी होते, अशा शब्दांमध्ये सावरकरांची आत्मचरित्रामध्ये स्तुती करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसला सावरकरांविषयीच्या धोरणात सुधारणा करायला सांगितले, पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे न ऐकता काँग्रेस नेत्यांनी सावरकरांवर चिखलफेक करायचे काम चालूच ठेवले आहे. Congress leaders contradicted each other on savarkar issue
कर्नाटक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी काल गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींची स्तुती करताना सावरकरांविषयी काल वाटेल ते गरळ ओकले. सावरकर राष्ट्रवादी होते. परंतु त्यांचे विचार कट्टरतावादी असल्याने ते भारतीय विचारसरणीशी मेळ खात नव्हते. सावरकरांनी गायीच्या हत्येचे समर्थन केले. सावरकर गोमांस खात होते, असे वस्तुस्थितीला धरून नसलेले अनेक आरोप दिनेश गुंडराव यांनी केले. त्या उलट महात्मा गांधी हे हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी हिंदू धर्मातल्या अहिंसा धर्माचे पालन केले. त्यामुळे गांधीजीच खरे हिंदुत्ववादी होते, असे दिनेश गुंडूराव म्हणाले. हे तेच दिनेश गुंडूराव आहेत, ज्यांचे वडील आर. गुंडूराव हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.
PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!
वास्तविक सावरकर या विषयावर काँग्रेसमध्येच प्रचंड मतभेद असल्याचे या निमित्ताने समोर आले. सावरकर “माफीवीर” असल्याचा “जावईशोध” राहुल गांधींनी लागलेला लावल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण देशभरात विविध न्यायालयांमध्ये खटले सुरू झाले. शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या एका बैठकीत सावरकरांविषयी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना स्पष्ट शब्दांत सुनावले होते. त्यानंतर राहुल गांधींनी सावरकरांचा विषय जाहीररित्या बोलायचे टाळले. पण त्यातून काँग्रेस नेत्यांनी कुठलाही “संदेश” न घेता दिनेश गुंडूराव यांच्यासारखे नेते वाटेल ते बोलत राहिले.
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात सावरकरांच्या सामाजिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्याविषयीचे धोरण काँग्रेसने सुधारण्याचा सल्ला दिला, पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला ऐकण्याऐवजी काँग्रेस नेते सावरकरांविरुद्ध गरळ ओकत राहिल्याचेच दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App