MVA : भाजपशी थोरल्या भावासारखे भांडणारे ठाकरे काँग्रेस समोर मुकाट झाले धाकटा भाऊ; पण स्ट्राईक रेटवरून देखील पवार ठाकरेंना नाही शकले रेटू!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपची थोरल्या भावासारखे भांडणारे उद्धव ठाकरे काँग्रेस समोर मोकाट धाकटा भाऊ झाले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील स्ट्राइक रेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा चांगला राहून देखील पवार ठाकरेंना मागे नाही रेटू शकले!!

वास्तविक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक चांगला राहिला. तो पक्ष 17 पैकी 14 जागा जिंकून पहिल्या नंबर वर राहिला. पवारांचा पक्ष 10 पैकी 8 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उद्धव ठाकरेंची शिवसेना 9 जागा जिंकून दुसऱ्याचा नंबर वर राहिली असली, तरी त्यांचा स्ट्राईक रेट मात्र सगळ्यात कमी राहिला. कारण ठाकरेंच्या शिवसेनेने 21 पैकी 9 जागा जिंकल्या.

Actor Govinda : अभिनेता गोविंदाची मुंबई पोलिसांकडून पुन्हा चौकशी, गोळी आपोआप सुटण्यावर पोलिसांचा विश्वास नाही

विधानसभा जागावाटपात काँग्रेसने स्ट्राईक रेटचा आधार सगळ्यात महत्त्वाचा मानला. तोच आधार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य करायला लावला. त्या आधारे केलेल्या जागा वाटपात काँग्रेसला 105 ते 110, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 95 ते 100 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 85 जागा आल्या. याचा अर्थ भाजपशी थोरल्या भावाच्या थाटात भांडणारे उद्धव ठाकरे काँग्रेस समोर नांगी टाकून मुकाटपणे धाकटे भाऊ झाले. पण शरद पवारांचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला राहून देखील पवार मात्र उद्धव ठाकरेंना मागे रेटू नाही शकले. हेच जागावाटपाच्या निष्कर्षातून समोर आले.

2014 मध्ये उद्धव ठाकरे भाजपशी थोरला भाऊ – धाकटा भाऊ या मुद्द्यावरूनच भांडत होते. 151 पेक्षा कमी जागा उद्धव ठाकरेंना मान्य नव्हत्या. त्यामुळे भाजपशी त्यांची युती तुटली. भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत 123 जागा जिंकून भाजप खऱ्या अर्थाभने महाराष्ट्रात सगळ्यात थोरला भाऊ झाला. शिवसेनेला 63 जागा मिळाल्याने तो आपोआपच धाकटा भाऊ ठरला होता. आता तर महाविकास आघाडीत काँग्रेसची “दादागिरी” सुरू झाली आहे. ठाकरे आणि पवार आपोआपच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे भाऊ बनले आहेत.

Congress big brother in MVA than thackeray and pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात