Congress अखेर 100 + पार; महाविकास आघाडीतल्या जागावाटपात ठाकरे + पवारांवर मात!!

Congress

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Congress महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 85 च्या खोड्यात अडकवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. पण दोन दिवस त्या बातम्या चालल्यानंतर देखील तो यशस्वी होऊ शकला नाही. काँग्रेसने अखेर 100 गाठलीच. काँग्रेसने 87 जागांवरचे उमेदवार जाहीर केले होते. उरलेले 14 उमेदवार संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी देखील दुजोरा दिला होता. त्यानुसार काँग्रेसने काल रात्री उशिरा 14 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करून काँग्रेसने महाविकास आघाडीत ठाकरे आणि पवारांच्या पक्षांवर कुरघोडी केली. Congress 100 candidate list declare

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जिथे जो पक्ष जिंकू शकेल, तिथे त्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील. असे उमेदवार देऊन जर काँग्रेस 100 जागा लढवत असेल, तर आम्हाला त्रास होण्याचे काही नाही, असे राऊत म्हणाले. या एका वक्तव्यातून संजय राऊत यांनी स्वतःच्या शिवसेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसची पुढे शरणागती पत्करली होती. काँग्रेसने देखील ठाकरे किंवा पवारांच्या दबावाखाली न येता शंभरी पार करण्याचे आपले ध्येय साध्य करून घेतले. Congress

महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा खूपच खेचला गेल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला 85 च्या खोड्यात अडकवले होते. संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात ज्यावेळी त्यांना सिल्वर ओक वर भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 85 जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे, असे तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागा जागांवर मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे, असे सांगा असे पवारांनी अशी सूचना पवारांनी या सगळ्या नेत्यांना केली होती. त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी 85 जागा लढवण्याचा फॉर्म्युला जाहीर केला, पण जयंत पाटील यांनी कानात कुजबूज करून संजय राऊत यांची बेरीज चुकवली. राऊतांनी 85 + 85 + 85 = 255 ची बेरीज 270 सांगितली. यातूऑ पवारांच्या खोड्यात काँग्रेस अडकली होती.

पण काँग्रेसच्या चलाख नेत्यांनी पवारांची “गेम” ओळखली. त्यांनी त्या रात्रीच पवारांचा तो 85 चा खोडा उधळून लावायचा निश्चय केला. दिल्लीत राहुल गांधींनी जागावाटपात पर्सनली लक्षात घातले. प्रत्येक जागेविषयी त्यांनी खल केला. राहुल गांधी महाराष्ट्रातल्या प्रदेश नेत्यांवर नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या पण काही झाले, तरी राहुल गांधींनी पर्सनली लक्ष घातल्यानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीत शंभरी गाठलीच. काँग्रेस 101 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने 24 ऑक्टोबरला 48, 26 ऑक्टोबरला 23 आणि 16, तर काल 14 उमेदवारांची यादी जाहीर केली. सचिन सावंतांचे नाव बदलून अशोक जाधवांचे नाव जाहीर केले. पण या सगळ्यात काँग्रेसने ठाकरे आणि पवारांवर विशेषतः पवारांवर मात करून महाविकास आघाडीतला वरचष्मा सिद्ध केला.Congress

Congress 100 candidate list declare

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात