विशेष प्रतिनिधी
सांगली : एकजूटीनं लढा दिल्याबद्दल सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. Congratulations to all ST employees for fighting in unity: Gopichand Padalkar
कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पडले.
मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल..
माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे आवाहन त्यांनी केले.
https://youtu.be/jogNm_x1ZOE
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App