महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू कोविडॉलॉजिस्टच झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करत आहेत,असे शिवसेनेच्या मुखपत्रातील संपादकीयमध्ये म्हटले आहे. त्यावर कंपाऊडरनेच ठाकरेंना फॅमिली डॉक्टरची पदवी दिली आहे का? असा सवाल केला जात आहे.Compounder writes Uddhav Thackeray is a family doctor of 12 crore people!
विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू कोविडॉलॉजिस्टच झाले.
त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करत आहेत,असे शिवसेनेच्या मुखपत्रातील संपादकीयमध्ये म्हटले आहे. त्यावर कंपाऊडरनेच ठाकरेंना फॅमिली डॉक्टरची पदवी दिली आहे का? असा सवाल केला जात आहे.
सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोविड-19′, करोना संकट व उपाययोजना’ यासंदर्भात केलेले सखोल अध्ययन महाराष्ट्राच्या कामी येत आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक खासियत असते.
सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाशी लढा व त्याबाबत जनतेला मिळणाºया आरोग्य सुविधा यातच ‘नैपुण्य’ प्राप्त केले असून आज संपूर्ण देशाला त्याचीच गरज निर्माण झाली आहे.
देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाशी कसे लढावे याबाबत तज्ज्ञांशी सतत संवाद साधत होते.
जगभरातील प्रसिद्धी माध्यमांत भारतातील प्रेतांचा खच, स्मशाने आणि कब्रस्तानांतील चेंगराचेंगरी याबाबत वार्ता आणि मन हेलावून टाकणारी छायाचित्रे रोजच प्रसिद्ध होत आहेत. त्यात महाराष्ट्र दिसत नाही याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही द्यायचे तर कोणाला द्यायचे?’ असा सवाल करण्यात आला आहे.
मात्र, सोशल मीडियावर सामनाच्या या संपादकीयची खिल्ली उडविली जात आहे. यापूर्वी एका मुलाखतीत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांना डॉक्टांपेक्षा जास्त कळते असे म्हटले होते.
त्यावरून त्यांच्यावर डॉक्टरांच्या संघटनांसह अनेकांनी टीका केली होती. आता उध्दव ठाकरे यांना त्यांनी फॅमिली डॉक्टरची उपाधी दिल्याने कंपाऊंडरने त्यांना पदवी दिली का? असे म्हटले जात आहे. संजय राऊत कंपाऊंडर आणि उध्दव ठाकरे फॅमिली डॉक्टर असे मिम्सही बनविले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App