
राज्यातील उर्जा निर्मिती केंद्राकडे केवळ दोन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहिला असल्याने राज्यावर आता भारनियमनाचे संकट ओढावले आहे. याचे परिणाम दिसू लागले आहे.कोळशा अभावी वीज उत्पादन घटले असून ऐन उन्हाळ्यात नागरिक शेत-यांचे हाल होत आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –राज्यातील उर्जा निर्मिती केंद्राकडे केवळ दोन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहिला असल्याने राज्यावर आता भारनियमनाचे संकट ओढावले आहे. याचे परिणाम दिसू लागले आहेत. बारामती परिमंडलातील अनेक गावात बत्तीगुल्ल झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य व्यापरी नागरिक आणि शेतक-यांना बसत आहे. Coal shortage in Maharashtra now power load regulations diffcult situation seen everywhere
मागणीप्रमाणे विजेचे उत्पादन होत नसल्याने महावितरणने आता आपत्कालीन लोडशेडिंगचा ग्राहकांना शॉक दिला आहे. या आपत्कालीन लोडशेडिंग मध्ये वेळेचे नियोजन नसल्याने केव्हाही वीज जाते. परिणामी बारामती परिमंडळातील अनेक गावे अंधारात आहेत. कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातील विज उत्पादन संकटात आले आहे. उर्जा निर्मिती केद्रांकडे केवळ दोन दिवसांचा कोळसा शिल्लक राहिल्याने विजेच्या मागणीप्रमाणे विजेचे उत्पादन होत नाही.
यामुळे महावितरणतर्फे कधीही आपत्कालीन लोड शेडिंग केले जात आहे. सध्या बारामती परिमंडळातील सर्व उपकेंद्रामध्ये लोडशेडिंग सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही क्षणी, कोणत्याही फिडरवर लोडशेडिंगचा एसएमएस उपकेंद्राला दिला जात आहे. त्यानंतर वीज गेल्यावर किती वेळात येईल याची देखील माहिती उपकेंद्र देखील देऊ शकत नाही. ऐन उन्हाळ्यात आपत्कालीन लोडशेडिंगमुळे आता ग्राहकांची चांगलेच हाल होणार आहेत. याबाबत बारामती परिमंडळ आणि अधिकृत सूचना जारी केली नसली तरी महावितरणच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मोबाईल व्हाट्सअप द्वारे आपापल्या परिसरातील वीज ग्राहकांना या आपत्कालीन लोडशेडिंग बाबत सतर्क केले जात आहे.
वीजेवर अवलंबून असणारे व्यावसायिक त्रस्त
बारामती परिमंडलात अनेक व्यावसायिक हे वीजेवर अवलंबून असतात. मात्र, वीज नसल्याने त्यांची कामे खोळंबली आहेत. वीज कधीही जात असल्याने तसेच ती कधी येईल याची श्वास्वती नसल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यात सर्वाधिक भरडले जात आहेत ते छोटे व्यावसायिक. आधी नोटबंदी, नंतर कोरोना आता भारनियमनामुळे व्यवसाय ठप्प पडण्याची वेळ आली आहे. आम्ही करायचे तरी काय अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.
Coal shortage in Maharashtra now power load regulations diffcult situation seen everywhere
महत्त्वाच्या बातम्या
- रशियासोबतच्या एस -४०० करारावर भारतावर निर्बंध लादण्याचा किंवा सूट देण्याचा निर्णय नाही : अमेरिका
- आधीच भाषा शिवराळ त्यात भरला अहंकार; राऊतांची स्वतःची तुलना आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि बाळासाहेबांशी!!
- सीबीआयकडून लष्कर पेपरफुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नल अटकेत
- Sanjay Raut – MNS : संपादक जेलमध्ये जाणार म्हणूनच पत्रकार परिषदेत शिव्या; मनसेचे संजय राऊतांवर शरसंधान!!