प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रात नव्याने राजकीय जमवाजमव करण्याच्या ऑफर्स सुरू झाल्या आहेत. यातली पहिली ऑफर प्रकाश आंबेडकरांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे. Prakash Ambedkar to Uddhav Thackeray; Ramdas Athavale’s light to Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी आधी काँग्रेस नेतृत्वाला वंचित बहुजन आघाडी करण्याची ऑफर दिली होती. या ऑफरला बराच काळ उलटून गेल्यानंतर काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. हे पाहून प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आज त्या भेटीला त्यांनी उजाळा देत शिवसेनेला वंचित बहुजन आघाडीची युती करण्याची ऑफर असल्याचे सांगितले.
दरम्यानच्या काळात रामदास आठवले यांनी लातूर मधून प्रकाश आंबेडकरांना नेतृत्वाची साद घातली. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी सोडून रिपब्लिकन पक्षात यावे. पक्षाचे नेतृत्व त्यांनी स्वतः करावे. त्यांच्यासाठी मी चार पावले मागे यायला तयार आहे, असे रामदास आठवले यांनी लातूर मधल्या एका कार्यक्रमात सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुटी स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रामदास आठवले लातूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात येऊन नेतृत्व करण्याची ऑफर दिली.
– राष्ट्रवादीला ऑफर नाही
या सगळ्या ऑफर्स मध्ये प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या राजकीय ऑफर्स स्कीम मधून वगळले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली होती तेव्हा देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वंचित बहुजन आघाडी युती करणार नाही, असे स्पष्ट केले होते. आता त्यांनी नव्याने शिवसेनेला ऑफर दिली आहे. यावर शिवसेना प्रकाश आंबेडकर यांना कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App