प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “थप्पड” राजकीय भाषणाने गाजला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या उद्धव ठाकरे स्तुतीमुळे देखील गाजला.CM uddhav Thackeray targets BJP in BDD chawal redevelopment program
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू अशा दिलेल्या कथित धमकीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उचलला. आम्ही जेवढ्या थपडा खाल्ल्यात त्याच्यापेक्षा दुप्पट दिल्यात. त्यामुळे आता एकच थप्पड अशी देऊ की परत उठणार नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रसाद लाड यांच्या कथित धमकीचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीतल्या आठवणी जागवल्या खऱ्या परंतु त्यांचे भाषण “थप्पड” या शब्दाभोवतीच गाजले. शरद पवारांनी देखील बीडीडी चाळीच्या इतिहासातील महत्त्वाचा उल्लेख केला. परंतु त्यांचे भाषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्तुतीमुळे चर्चेत राहिले.
मुख्यमंत्री म्हणाले, की आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण आम्ही अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने थपडा दिल्या आहेत.यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थपडा मारण्याची धमकी देऊ नये.
आम्ही एकच थपड अशी देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल असे स्वप्न कधी पाहिले नव्हते. येत असताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूनं लोकं होती म्हणून मी गाडीतून उतरून चालत आलो. आता चाळींचे टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिले ते ऋण आपण फेडू शकत नाहीत.
या चाळीच्या इतिहासाची मूळं खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचं घरं असायला हवं. तेच आम्ही करतोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवार म्हणाले, की कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठे पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. बीडीडी चाळ आणि या सर्व परिसरात एक दृष्टीने देशाचाच इतिहास घडला. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे देखील वास्तव्य या परिसरात होते.
अण्णाभाऊ साठेंचं देखील होते. देशाच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीत ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही संचार या भागात होता आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संबंध महाराष्ट्र जागृत करण्यासंबंधी कार्य करणारे आचार्य अत्रे यांचं देखील वास्तव्य या परिसरात होते, अशा आठवणी शरद पवार यांनी जागविल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App