बहुतेक लोक गोंधळलेले , कारण त्यांच्या आयुष्याला दिशाच नाही.


एखाद्या नदीला वाहण्यासाठी दोन किनाऱ्यांची गरज असते. नेहमीच्या नदीत पाणी नियंत्रित असते, पुरादरम्यान त्याला कुठलीही दिशा नसते. त्याचप्रमाणे, आपल्या आयुष्यातील ऊर्जेलाही वाहण्यासाठी एक प्रकारची दिशा आवश्यतक असते. आज बहुतेक लोक गोंधळलेले आहेत, कारण त्यांच्या आयुष्याला दिशाच नाही. आपण आनंदी असतो, तेंव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात जीवनऊर्जा असते.Most people are confused, because their lives have no direction.

मात्र, ती प्रवाहित नसल्यास तुंबते. त्यामुळेच, जीवनऊर्जेला एका दिशेने प्रवाहित राहण्यासाठी बांधीलकी आवश्य्क ठरते. जीवन बांधीलकीमुळे पुढे जाते. आपण आपल्या आयुष्यातील छोट्यामोठ्या गोष्टींचे निरीक्षण केले तर, त्या एका विशिष्ट बांधीलकीने पुढे जात असल्याचे लक्षात येईल. एखादा विद्यार्थी बांधीलकीतून शाळा किंवा महाविद्यानलयात प्रवेश घेतो. कुटूंबात हीच बांधिलकी असते. आई मुलाप्रती वचनबद्ध असते, तर मूलाची बांधिलकी पालकाशी असते.

बांधिलकी कमी असल्यास आपण गुदमरतो, कारण आपली बांधिलकीची क्षमता खूप अधिक असते. आपण अनेक कामे हातात घेतो, तेव्हा त्यापैकी एखादे चुकीचे होते. अशावेळी आपण इतर कामांवर लक्ष्य केंद्रित करू शकतो. त्यामुळे, आपण त्या विशिष्ट कामाच्या अपयशाचा कमी परिणाम होतो. दुसऱ्या बाजूला आपण एकच काम हाती घेतले आणि त्यात अपयशी ठरलो, तर त्याचा मोठा परिणाम घडतो.

सामान्यत: आपली बांधिलकी स्रोतांवर अवलंबून असते. आपण प्रयोगाच्या पातळीवर मोठी बांधिलकी दाखविली तर हे स्रोत आपोआप आकर्षित होतात. कुटूंबाप्रति बांधीलकी असेल, तर कुटूंबच तुम्हाला आधार देते. समाजाबद्दल बांधिलकी जोपासत असू तर समाजाच्या आधाराचा आनंद लुटू. दूरवरचा विचार केल्यास अशी बांधिलकी आयुष्यात नेहमीच सुखकारक ठरते. प्रत्येकाने हे जग जगण्यासाठी अधिक चांगले बनवण्याची बांधिलकी जोपासावी.

स्वत:मध्ये अशी बांधिलकी कायमस्वररुपी जोपासल्यामुळे तुम्ही जगासाठी प्रिय व्हाल. जगाची काळजी घेतल्यावरच जगही तुमची काळजी घेते. तुम्ही स्वप्नं पाहत नाही, तोपर्यंत ती ओळखता येणार नाहीत. प्रत्येक शोध हा स्वप्नातूच लागलायं. त्यामुळे, अशक्यय गोष्टींची स्वप्न पाहा.

Most people are confused, because their lives have no direction.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण