OBC Reservation Issue : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात आंदोलन छेडण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे म्हणाले की, संघर्ष कधी करायचा, संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. परंतु, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका असल्याचंही ते म्हणाले. CM Uddhav Thackeray Criticizes BJP Agitations on OBC Reservation Issue
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात आंदोलन छेडण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे म्हणाले की, संघर्ष कधी करायचा, संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. परंतु, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका असल्याचंही ते म्हणाले.
कोल्हापूर येथील सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ – LIVE https://t.co/SfnBFoWvdj — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2021
कोल्हापूर येथील सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ – LIVE https://t.co/SfnBFoWvdj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2021
कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार मानले. ते म्हणाले, न्याय आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग असू शकतो. परंतु संघर्ष केव्हा करायचा आणि संवाद केव्हा करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरू केलात. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तूर्तास फार बोलणार नाही.
याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नाती ओढूनताणून पुढे नेता येत नाहीत. या नात्यांचा उल्लेख कुणासाठी होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सीएम ठाकरे पुढे म्हणाले की, कोल्हापुरात शाहू महाराजांच्या जयंती दिनी सारथी उपकेंद्राचं उद्घाटन होत आहे. याविषयी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज काहीही करू शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजूतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन देत असल्याचंही ते म्हणाले.
CM Uddhav Thackeray Criticizes BJP Agitations on OBC Reservation Issue
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App