एक चर्चेचा विषय म्हणजे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते काय बोलतात या कडे सर्वांचेच लक्ष आहे.Chief Minister’s visit to Baramati tomorrow; Baramatikar ready for the reception
विशेष प्रतिनिधी
बारामती : उद्या (ता. 2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारामती दौरा आहे.अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनक्युबेशन, इनोव्हेशन अँड सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत.दरम्यान या निमित्ताने शहरात जोरदार तयारी सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील संपूर्ण दौ-यात असतील.तसेच खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत. दरम्यान एक चर्चेचा विषय म्हणजे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते काय बोलतात या कडे सर्वांचेच लक्ष आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांचे सकाळी साडेनऊ वाजता बारामती विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते बारामतीतून ट्रस्टने उभारलेल्या डेअरी फार्मवर सव्वादहाच्या सुमारास जातील.तेथील पाहणी करुन मुख्यमंत्री कृषी महाविद्यालयानजिक उभारलेल्या इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरक़डे येतील.
इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्री व प्रसिध्द उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर संस्थेची पाहणी करुन अप्पासाहेब पवार सभागृहात मुख्य सोहळा होणार आहे.या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी मुख्यमंत्री भोजन करणार असून मुख्यमंत्री दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा बारामतीत असल्याने स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल व आज सर्व तयारीचा आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री ज्या रस्त्याने येणार आहेत , त्या सर्व रस्त्यांची डागडुजी पूर्ण झाली आहे.यामध्ये विमानतळ ते शारदानगरच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांना बारामतीचा विकास दाखविला जाणार आहे.
इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या उदघाटन निमित्ताने अनेक नामवंत उद्योगपतीही बारामतीत येणार असल्याने बारामतीसाठी काही नवीन संधी भविष्यात उपलब्ध होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या दौ-यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.
विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवार हे महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र असतील, त्यामुळे काही राजकीय फटाके फुटणार का याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App