विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता उद्धव ठाकरे त्यांच्यात नाही. राज्य सरकार साडेसात दिवसच टिकेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. State Government will last seven and half days only : Narayan Rane
बुलडाण्यामध्ये मागील आठवड्यातील मोर्चामध्ये भाजपच्या नेत्याने तथा माजी जिल्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेला हिजड्यांची फौज, असे संबोधले होते. त्याबाबत नारायण राणे यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी त्या शब्दांच समर्थन करणार नाही. पण ते अनेक सैनिकांचं मत आहे. त्यामुळे आता सगळेजण येणाऱ्या दोन वर्षात भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि सगळ्यांना तपासून भाजपामध्ये प्रवेश देऊ.
https://www.youtube.com/watch?v=1FXJnGMpOP0
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता ठाकरे यांच्यात नाही,तसेच यावेळी राज्यातील सरकार किती दिवस टिकेल ? या प्रश्नावर ते म्हणाले, तर साडेसात दिवस. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना चिखली येथे उत्तरे दिली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App