Maratha Reservation News : जाळपोळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची जरांगेंशी फोनवरून चर्चा जरांगे आजपासून पाणी पिणार!!

Chief Minister's discussion with Jarange over phone Jarange drink water from today

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maratha Reservation News :  मराठा आंदोलनाला अति तीव्र हिंसक वळण लागल्यानंतर महाराष्ट्राचे गृह मंत्रालय ऍक्टिव्ह झाले असून मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेऊन जाळपोळ करणाऱ्यांवर गृहमंत्रालयाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आमदारांची घरे जाणणाऱ्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले. Chief Minister’s discussion with Jarange over phone Jarange drink water from today

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली त्यानंतर जरांगे पाटील हे आजपासून पाणी प्यायला तयार झाले आहेत. हिंसक आंदोलनाला आपला पाठिंबा नाही, असे जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

हिंसाचार असाच सुरू राहिला तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असे कालचा रांगे पाटलांनी म्हटले होते. परंतु, काल राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि जयदीप क्षीरसागर यांची घरे गाड्या पेटवल्या गेल्या. बीड स्थानकामध्ये 72 गाड्या फोडल्या आणि जाळपोळ केली. बीड, धाराशिव मध्ये संचारबंदी लादावी लागली. बीडमध्ये अनिश्चित काळापर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला.

मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय जाळले!!

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांना जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

सत्ताधारी पक्षाचे लोकच जाळपोळीला चितावणे देत आहेत असा आरोप जरंगे पाटलांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांना आयडेंटिफाय करून कठोर कायदेशीर कारवाई सुरू केल्यावर त्यांचे खरे स्वरूप समोर येणार आहे.

Chief Minister’s discussion with Jarange over phone Jarange drink water from today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात