भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा; पंतप्रधान मोदींची सिंधुदुर्गावरून घोषणा!!

Sindhudurga!!

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलेला नौदल दिन भारतीय नौदलाने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांची सर्व नामाभिधाने भारतीय असतील आणि नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अंकित असेल या त्या घोषणा होत.Chhatrapati Shivaji Maharaj on Indian Navy uniform; Prime Minister Modi’s announcement from Sindhudurga!!

नौदल दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये राजकोट किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण मोदींनी केले.



नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्या. त्यांनी सिंधुदुर्गातील किल्ल्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी दोन मोठ्या घोषणा केली. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय परंपरेनुसार देणार असल्याची घोषणाही मोदींनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आज भारत गुलामीच्या मानसिकतेला मागे सोडून पुढे जात आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची झलक बघायला मिळेल. हे माझं भाग्य आहे की, नौदलाच्या ध्वजावर मला गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या अपोलेट्सवरही छत्रपती वीर शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मला अजून एक घोषणा करताना आनंद होत आहे. भारतीय नौसेना आपल्या रँक्सचं नामकरण भारतीय परंपरेच्या अनुसार करणार आहे.

2023 चा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित; सिंधुदुर्गावर भव्य आयोजन!!

आम्ही सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यावर जोर देत आहोत. मी नौदलाचं अभिनंदन करतो की, तुम्ही नेव्हल शिपमध्ये पहिली महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आजचा भारत आपल्यासाठी मोठे लक्ष्य निश्चित करत आहे. ते मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती लावत आहे. भारताजवळ या लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी एक मोठी ताकद आहे. ही ताकद 140 कोटी भारतीयांच्या विश्वासाची आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर यांना अभिवादन

सिंधुदुर्गाच्या भूमीवरुन आज नौदल दिनाच्या शुभेच्छा देणं ही खूप मोठी घटना आहे. सिंधुदुर्गाच्या ऐतिहासिक किल्ल्याला पाहून प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरते. कोणत्याही देशासाठी समुद्र सामुग्री किती महत्त्वाची आहे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो तो सर्वात शक्तीमान आहे. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली. कान्होजी आंग्रे असतील, मायाजी नाईक भाटकर असतील, असे अनेक योद्धा आजही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. मी आज नौसेना दिवसानिमित्ताने देशाच्या या वीरांना प्रणाम करतो, असे मोदी म्हणाले.

शेकडो वर्षांपूर्वी आजची टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा आम्ही सिंधुदुर्गात किल्ले बनवले. एकेकाळी सुरतच्या बंदरावर 80 पेक्षा जास्त देशाचे जहाज राहत होते. भारताच्या याच सामर्थ्याच्या आधारावर दक्षिण पूर्व आशियाच्या देशांनी आपला व्यापार वाढवला. विदेशी आक्रमकांनी आक्रमण केले तेव्हा आपल्या संस्कृतीवर निशाणा साधला. जो भारत जहाज बनवण्यात प्रसिद्ध होता, त्याची कला, कौशल्या सर्व काही ठप्प करण्यात आले. भारत आता विकसित होण्याच्या लक्ष्यावर जात आहे, आल्याला आपल्या गौरवाला परत आणायचे आहे.

आमचं सरकार प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. भारत ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रवास करत आहे. अवकाश आणि समु्द्रात जगाला भारताचं सामर्थ्य दिसत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Chhatrapati Shivaji Maharaj on Indian Navy uniform; Prime Minister Modi’s announcement from Sindhudurga!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात