प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सीमा हैदर आणि राजस्थान मधली अंजू यांचे विवाह संशयाच्या भोवऱ्यात असताना महाराष्ट्रातून एक असाच संशयास्पद मामला समोर आला आहे. Chhatrapati Sambhajinagar woman married to Pakistani; Residence in Malegaon
छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेचा दहशदवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून तिची कसून चौकशी सुरू आहे. या 32 वर्षीय महिलेने पाकिस्तानात पुनर्विवाह केला आणि त्यानंतर ती भारतात परतली. ती मालेगावात निवासाला होती पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केल्यानंतर तिने दुबई, पाकिस्तान आणि लिबिया या दोन देशांचा प्रवास केला आहे.
या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून या संबंधित प्रकरणाचा राज्याचे दहशतवादविरोधी पथक केंद्रीय यंत्रणांसह तपास करत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा देणाऱ्या सीआयएसएफ दल आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांना अलीकडेच एक धमकीचा निनावी ई-मेल आला होता. त्यानुसार हा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी एटीएसने संबंधित महिलेचा जबाब नोंदवला आहे.
सिडको पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार
या महिलेच्या पतीने डिसेंबर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. एटीएसने महिलेच्या पतीचा जवाब नोंदवला असून ती महिला 4 ऑगस्ट पासून मालेगावमध्ये तिच्या पालकांसोबत राहत असल्याचे दिसून आले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात महिलेने परदेशी प्रवास केल्याचे समोर आले. एटीएस अधिकारी महिलेच्या परदेशी प्रवासाच्या इतिहासाची पडताळणी करत आहेत.
पाकिस्तानी नागरिकासोबत दुबई टूर
ही महिला छत्रपती संभाजीनगरची असली तरी ती पालकांसोबत मालेगावमध्ये राहते. या दरम्यान या महिलेने पाकिस्तानी नारगिकासोबत संपर्क वाढवला. त्या नंतर महिला पाकिस्तानी नागरिकासोबत गेल्या वर्षी दुबईला जाऊन आल्याचे तपासात समोर आले आहे.
व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा आधार
व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या आधारे ही भारतीय महिला पाकिस्तानात एका नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. या पाकिस्तानी कुटुंबातील सदस्य पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयमध्ये कार्यरत असल्याचे देखील उघड झाले आहे.
पाकिस्तान, लीबिया या देशांचा प्रवास
सदर प्रकरणातील महिलेने दुबईमध्ये पाकिस्तानी तरुणाशी लग्न केले आणि त्यानंतर त्याच्यासोबत पाकिस्तान आणि लीबिया अशा देशांत प्रवास देखील केला. सायबर सेल पोलिस महिलेच्या ई-मेलच्या तपशिलांची पडताळणी करत आहे. संशयित महिला कोणत्याही भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहे का?? याचा तपासही एटीएस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App