Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजप उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही, क्षमतेवरच उमेदवार ठरतो

Chandrasekhar Bawankule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chandrasekhar Bawankule महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे. त्यामुळेच हे डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचे काम करत असल्याचे ते म्हटले.Chandrasekhar Bawankule

महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर ते केंद्र सरकारची मदत घेणार नाहीत. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असले तरी देखील ते मदत घेणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्राचे नुकसान करतील. त्यामुळे युतीचेच सरकार चांगले काम करणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. काल देखील त्यांनी बावनकुळे यांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती. यावर इच्छुक उमेदवारांना भेटणे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही

भारतीय जनता पक्ष कोणत्याही पद्धतीने उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही. उमेदवार हा त्याच्या क्षमतेवर ठरत असतो. मतदारसंघातील जनतेचे मत काय आहे? तेथील कार्यकर्त्यांचे मत काय आहे? यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे समाज म्हणून कोणताही निर्णय करण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वावर निर्णय केला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेतो. त्यामुळे त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दोन उमेदवारी इच्छुक असतील तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत

एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवारी इच्छुक असतील आणि दोघांनी उमेदवारी मागितली, तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही कोणी विधानसभा निवडणूक लढवत असेल, तरच त्याला बंडखोरी म्हटले जाते. त्यामुळे एका मतदारसंघात जास्त इच्छुक असणे, ही बंडखोरी होत नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणाचीही समजूत काढण्याची आवश्यकता नाही. पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेत असतात. असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Chandrasekhar Bawankule On BJP candidates Assembly Elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात