“कुटुंबप्रमुख” मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा आवाजच दीड वर्षापासून ऐकू येत नाहीए; चंद्रकांतदादांचा टोला

प्रतिनिधी

मुंबई – महाविकास आघाडीतले घटक पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यावरून आघाडीतल्याच नेत्यांचे वाभाडे काढत असताना भाजपने राज्यात घ़डत असलेल्या बलात्काराच्या अतिगंभीर प्रकरणांची दखल घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.chandrakantdada patil targets CM uddhav thackeray over law and order issue in maharashtra

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केले आहेत.



या ट्विटमध्ये चंद्रकांतदादा म्हणतात…

आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही.

कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे!

आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का?

chandrakantdada patil targets CM uddhav thackeray over law and order issue in maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात