बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून चंद्रकांतदादा – ठाकरे – शिंदे यांच्यात घमासान

प्रतिनिधी

मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड घमासन माजले आहे. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा हात नव्हता. ज्या दिवशी बाबरी मशीद पडली, तेव्हा तिथे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिक उपस्थित नव्हते, असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड संताप उफाळला असून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. Chandrakant patil, Uddhav Thackeray and eknath shinde fight each other over babri masque demolition

बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशीचा सर्व घटनाक्रम उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत विशद करून सांगितला आहे. बाबरी मशीद ज्यावेळी दिवशी पडली, त्यादिवशी सायंकाळी मी बाळासाहेबांच्या खोलीत गेलो आणि बाबरी पडल्याची माहिती त्यांना सांगितली. त्यावेळी त्यांचे पहिले उद्गार असे होते, की बाबरी शिवसैनिकांनी पडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांचे हेच उद्गार नंतर जगप्रसिद्ध झाले. त्यांच्यावर लखनऊ कोर्टात केस चालली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती वगैरे नेत्यांवरही ही केस चालली. पण आता चंद्रकांतदादा पाटील बाबरी पाडण्यात शिवसैनिक नव्हते, असा दावा करत आहेत त्याबद्दल त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अथवा त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हाकलून दिले पाहिजे आणि चंद्रकांत दादांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची हिंमत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.



पारनेरच्या शेतावरून मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावातील शेतातून प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री तिथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. एकनाथ शिंदे म्हणाले, की माझे चंद्रकांतदादांशी सविस्तर बोलणे झाले आहे. त्यांनी बाळासाहेबांवर नव्हे, तर माजी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बाबरी पडली तेव्हा ते कुठे होते?, असा सवाल त्यांनी केला होता. बाळासाहेबांनी कायम प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली म्हणल्यावर त्यांनी अभिमान व्यक्त केला. त्यांच्याविरुद्ध लखनौ कोर्टात केस चालली. त्यांनीच त्यावेळी गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे श्रेय कुणी हिरावून घेण्याचा प्रश्न नाही. बाळासाहेबांनी बाबरी पडल्यानंतरच्या मुंबईत झालेल्या दंगलीमध्ये देखील प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन मुंबई वाचवली. हिंदूंचे रक्षण केले. बाळासाहेब नसते तर काय झाले असते?, असा अहवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

पण त्याचवेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांचा देखील समाचार घेतला. आज जे हिंदुत्वाचा उच्चार नावाचा उच्चार करत आहेत ते सध्या कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत? ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याबरोबर ते सत्तेत बसले. ज्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला राम मंदिराला विरोध केला त्यांच्या ते गळा भेटी घेत आहेत आणि ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?, असा उलटा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी अपमान केल्यानंतर शिवसेना – भाजप यांनी एकजूट दाखवून महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले. त्यानंतर आता चंद्रकांतदादा पाटलांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात चंद्रकांतदादा – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात घमासान माजले आहे.

Chandrakant patil, Uddhav Thackeray and eknath shinde fight each other over babri masque demolition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात