प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तथाकथित पंतप्रधानपदावरून महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार जुंपली आहे. आमच्या बळावर खासदार निवडून आणणारे आज दिल्लीचे राजकारण करू इच्छितात. पण त्यासाठी फिरावे लागते. वर्षभरातून दोनदा देखील मंत्रालयात न जाणाऱ्यांनी दिल्लीच्या राजकारणाच्या वल्गना करू नयेत, अशी टीका चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फलटणमध्ये केली होती. Chandrakant Dada patil and sanjay raut targets each other over uddhav Thackeray and sharad pawar’s so called national politics
त्याला संजय राऊत यांनी दिल्लीतून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी कोणाला कोणाच्या खांद्यावर वाढवले हे सगळे जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनीच कुठल्या वल्गना करू नयेत, असे संजय राऊत म्हणाले. काहींच्या वेदना दोन वर्षांपूर्वीपासून आहेत. त्या अशा कधीमधी बाहेर येत असतात. मी जर काही आणखी बोललो तर त्यांचे अधिक दुखेल आणि महाराष्ट्रात विरोधकांची प्रकृती नीट राहावी असे मला वाटते. त्यामुळे मी जास्त बोलत नाही, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
शरद पवार हे तर काय नेहमीच पंतप्रधान होत असतात. संजय राऊत हे कधी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करतात, तर कधी शरद पवारांना पंतप्रधान करतात. पवार हे गेली तीस वर्षे पंतप्रधानपदाच्या रांगेतच उभे आहेत, असा टोला चंद्रकांत दादा पाटील यांनी लगावला होता.
त्यावर संजय राऊत यांनी देशात आज शरद पवार यांच्या उंचीचा राजकीय नेता नाही. सर्वच पक्षांमध्ये नेते त्यांना आदर आणि सन्मान देत असतात. ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येऊन आपापल्या राजकीय खेळी करत आहेत. दोन्ही नेत्यांच्या तथाकथित राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा फक्त प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असतात. केंद्रीय पातळीवर कोणत्याही धोरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फरक पडल्याचे फारसे कधी जाणवले नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून तर तशी इच्छाही व्यक्त केली नाही. पवारांनी कायम राष्ट्रीय राजकारणाची हूल देत महाराष्ट्रात राजकारण खेळणे पसंत केले आहे. अशाच राजकीय स्थितीमध्ये चंद्रकांत दादा पाटील आणि संजय राऊत हे ठाकरे पवार यांच्या तथाकथित पंतप्रधानपदावरून आणि राष्ट्रीय राजकारणावरून एकमेकांशी भांडताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App