वृत्तसंस्था
अमरावती : आंध्रप्रदेश विधानसभेत महिला सक्षमीकरण या विषयावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधक तेलगू देशम पक्ष यांच्यात जबरदस्त हंगामा झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीविषयी सत्ताधारी आमदार रामबाबू यांनी अत्यंत अपमानास्पद टिप्पणी केली. यावरून दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदार वादविवादही धुमश्चक्री झाली.Chandrababu sheds tears at the press conference; Pledges like Jayalalithaa; He will not return to the Legislative Assembly unless he becomes the Chief Minister
या सर्व प्रकारच्या निषेधार्थ चंद्राबाबू नायडू सभागृहाबाहेर पडले आणि त्यांनी आपल्या आमदारांची बैठक आपल्या कार्यालयात घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू यांना रडू कोसळले. मी आतापर्यंत अनेक डिबेटमध्ये भाग घेतलाय. तिथे अनेकांची भांडणे झालीत पण अशी कौरवांची सभा मी पाहिली नव्हती,
अशा शब्दांमध्ये त्यांनी वायएसआर काँग्रेसचे वाभाडे काढले. पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना दोन-तीन मिनिटे बोलता येईना. पण त्याच वेळी त्यांनी ही प्रतिज्ञा ही केली की आंध्र प्रदेशात पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत मी विधानसभेची पायरी चढणार नाही.
चंद्राबाबूंचा या पवित्र्यामुळे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आठवण झाली. जयललिता आणि त्यांचे विरोधक द्रमुक पक्षाचे करुणानिधी यांच्या राजकीय वैर टोकाला गेले होते. त्यावेळी तामिळनाडू विधानसभेत द्रमुकच्या आमदारांनी जयललितांच्या साडीला हात घातला होता.
त्या वेळी संतप्त झालेल्या जयललिता यांनी मी मुख्यमंत्री झाल्याशिवाय तामिळनाडू विधानसभेत परत येणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. पुढच्याच निवडणुकीत करुणानिधींच्या द्रमुक व पक्षाचा पराभव करून जयललिता यांनी ती प्रतिज्ञा खरी करून दाखवली आणि मुख्यमंत्री म्हणून त्या विधानसभेत परतल्या होत्या.
चंद्राबाबू नायडू यांचा आजचा हा पवित्रा बघून त्यावेळी संतप्त झालेल्या जयललितांच्या आठवण झाली आणि त्यानंतरच्या घटनाक्रमालाही उजाळा मिळाला. त्यावेळी जयललिता यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तामिळनाडू अक्षरशः पिंजून काढला होता. छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांनी जाऊन सभा घेतल्या होत्या. तामीळ जनतेशी आपले नाते पुन्हा प्रस्थापित केले होते. त्यातूनच त्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला होता.
आता चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसवर कशी मात करतात? येत्या दीड-दोन वर्षांमध्ये ते आंध्रप्रदेशात फिरून कसे रान पेटवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App