जयललितांचे वारसदार आहेत गुळाचे व्यापारी, पक्षाच्या हायकमांडमध्येही नव्हते आणि चार वर्षांत बनले सर्वेसर्वो

तामीळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाचे स्टॅलीन यांचा सामना अण्णाद्रुमुकचे पलानीस्वामी यांच्याशी होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रुमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांच्याशी पाठीशी राहणारे पलानीस्वामी त्यांचे वारसदार बनले आहेत. पलानीस्वामी यांनी आपली कारकिर्द गुळाचे व्यापारी म्हणून सुरू केली होती. Palaniswami, face of AIADMK, not even in the party’s high command and became Chief minister in four years


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामीळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत द्रवीड मुनेत्र कळघम पक्षाचे स्टॅलीन यांचा सामना अण्णाद्रुमुकचे पलानीस्वामी यांच्याशी होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रुमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांच्याशी पाठीशी राहणारे पलानीस्वामी त्यांचे वारसदार बनले आहेत. पलानीस्वामी यांनी आपली कारकिर्द गुळाचे व्यापारी म्हणून सुरू केली होती.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईडाप्पडी पलानीस्वामी हे ईपीएस नावाने ओळखले जातात. ते अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत दोन वेळा लोकसभा आणि दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, तामीळनाडूच्या राजकारणाचा नूरच काही वेगळा आहे. एखाद्या पक्षाला निवडून दिले की जनता त्याच्या पारड्यात भरभरून मते टाकते. त्यामुळे अगदी बड्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागतो. तरीही आज अण्णाद्रमुक पक्षाचा प्रमुख चेहरा पलानीस्वामी आहे. 

विशेष म्हणजे एमी. जी. रामचंद्रन किंवा जयललिता यांच्या काळात पक्षाच्या हायकमांडमध्ये नसलेले पलानीस्वामी आज पक्षाचे सर्वेसर्वा बनले आहेत. एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष दोन गटांत विभागला गेला होता. एक एमजीआर यांची पत्नी व्ही. एम. जानकी गट, तर दुसरा जयललिता यांचा गट. पलानीस्वामी यांनी जयललिता यांची पाठराखण केली. त्यावेळेपासून ते जयललिता यांचे विश्वासू बनले होते.

माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाºया पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. शशिकला यांना झालेला तुरुंगवास, टीटीव्ही दिनकरन यांचे बंड आणि राज्यातील विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. सेलम जिल्ह्यातील गुळाचे व्यापारी, शेतकरी असलेले पलानीस्वामी यांना बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करता आले नाही.

१९७४ मध्ये त्यांनी अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. १९८९ मध्ये ईडाप्पडी मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. १९९१ मध्ये त्यांनी दुसºयांदा विजय मिळविला. मात्र, १९९६ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९८ मध्ये ईपीएस यांनी त्रिचेंगोडू लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला; पण १९९९, २००४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००६ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला. २०११ मध्ये विजय मिळविला.

२०११ मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सेलम जिल्ह्यात त्यांचा दबदबा वाढला. २०१६ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी १० जागा त्यांनी अण्णाद्रमुकच्या खात्यात घेतल्या होत्या. तामिळ राजकारणात प्रभाव असलेल्या गोंडूर जमातीत त्यांचे प्राबल्य वाढले होते.

Palaniswami, face of AIADMK, not even in the party’s high command and became Chief minister in four years

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*