विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, नागपूर भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल, असा हा अंदाज आहे. Chance of rain in some places in the evening
गेल्या आठ दिवसांपासून प्रखर उष्णतेचा सामना विदर्भासह राज्यातील ठिकठिकाणच्या जनतेला करावा लागत आहे. वारे आणि पावसामुळे तापमान घटून दिलासा मिळू शकेल. पुण्यात सायंकाळी पाच नंतर जोराचे वारे वाहू लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App