विशेष प्रतिनिधी
इंदापूर : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातली वैयक्तिक शाब्दिक लढाई जोरावर आली आहे. जरांगे पाटील छगन भुजबळ हल्लाबोल करत आहेत तर छगन भुजबळ त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत मराठा आंदोलकांनी र्व पुढार्यांना गावबंदी केल्याचे सुरुवातीला सांगितले गेले, पण नंतर गावबंदीतून चतुराईने फक्त शरद पवारांच्या गटाला वगळले. नेमके त्याच वर्मावर इंदापुरातल्या ओबीसी मेळाव्यात आज छगन भुजबळांनी बोट ठेवले.Chagan bhujbal targets manoj jarange patil over selective “gaonbandi”!! and only favouring sharad pawar faction
गावबंदी फक्त एकाच पक्षाला नाही. बाकी सगळ्या पुढार्यांची पक्षांच्या पुढार्यांना गावबंदी केली आहे. पण जरांगे पाटलांच्या बोर्डाशेजारी रोहित पवारांच्या स्वागताचे बोर्ड लावले आहेत. हे आम्हाला समजत नाही का??, आम्ही तुमची गाव बंदी मानत नाही, अशा परखड शब्दांमध्ये छगन भुजबळ यांनी आज जरांगे पाटलांना सुनावले.
छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी काही लोकांनी छगन भुजबळ यांचा ताफा गेलेल्या ठिकाणचा रस्ता गोमूत्र शिंपडून “पवित्र” केला होता. त्यावरून छगन भुजबळ यांनी जोरदार हल्ला चढवला. तुम्ही रस्त्यावर गोमूत्र शिंपडले. मी शुद्र म्हणून गोमूत्र शिंपडले ना? होय, मी शुद्र आहे. मी दलित, बौद्ध आणि मराठ्यांच्या वस्तीत वाढलो. आम्ही शुद्र आहोत ना. मग कशाला आमच्या आरक्षणात येता??, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला.
होय मी शुद्र आहे. माझे लहानपणापासून आयुष्य दलित, बौद्ध, मराठा, लिंगायत आणि यूपीच्या भय्यांसोबत गेले. मी दलितांसोबत वाढलो. मी आहेच शुद्र. आम्ही ओबीसी शुद्र आहोत. तुम्ही गोमूत्र शिंपडता आणि मग तुम्ही आमच्याबरोबर शुद्र होण्यासाठी कुणबी सर्टिफिकेट मागता आणि आमरण उपोषण करता? अरे वारे वा चोंग्यांनों. आम्ही शुद्र नाय मग कशाला आमच्यात येता?? तुम्ही उच्च तर उच्च. राहा तिकडे उंचीवर. रस्ते मीच बनवले. झाडू ते मारत आहेत. त्याला काय करायचे??, असा टोला छगन भुजबळांनी हाणला.
एका पक्षाला गावबंदी का नाही?
यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या गावबंदीच्या मुद्द्यावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एका गावातील माहितीच दिली. या गावात गावबंदीचा एका बाजूला बोर्ड लावलाय, तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांच्या स्वागताचे फलक लावलेत. त्यांच्या सभाही गावात होतात. फक्त आम्हालाच गावबंदी आहे. सर्वांना गावबंदी. फक्त एकाच पक्षाला गावबंदी नाही. एकाच पक्षाच्या नेत्याला गावबंदी नाही. आम्हाला गावबंदी. ही “सिलेक्टीव्ह” गावबंदी आहे. पोलिसांना सांगतो, हे बोर्ड काढा. गावबंदी केली तर शिक्षेची तरतूद आहे, असे भुजबळ म्हणाले. सर्वांच्या संयमाला मर्यादा असतात. संयम संपला तर क्रोधाला आवर घालता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी, सरकारने या प्रकाराला वेळीच आवर घातला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
तर सहानुभूती मिळाली नसती
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं. अंतरवलीत जमाव हिंसक झाला, 79 पोलीस अधिकारी जखमी झाले. अंमलदार. पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केल्याने 50 आंदोलक जखमी झाले. ही बाजू त्यावेळीच पुढे यायला हवी होती. त्याला सहानुभूती मिळाली नसती. शेवटी विधानसभेत सर्व खरं बाहेर आलं, असा टोलाही भुजबळांनी जरांगेंना हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more