प्रतिनिधी
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून 2023 – 24 राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना, बारावी आणि सीईटीच्या प्रत्येकी 50 % गुणांचा विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीईटीची संख्या कमी करून प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.CET Important Decision: Twelfth in Vocational Course Admission – 50% importance for CET marks each
उदय सामंत म्हणाले की, सीईटी सेलकडून राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष सीईटीवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थीच नसल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 % महत्त्व देण्याच्या निर्णयांपर्यंत आलो आहोत. या आधी 2012 मध्ये या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती, असे उदय सामंत म्हणाले.
निर्णय का?
नुसत्या बारावीच्या गुणांवर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष सीईटीवर केंद्रित झाले आहे. बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थीच दिसत नाहीत. म्हणून मग येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावी आणि सीईटी यांचे समसमान गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App