विशेष प्रतिनिधी
मुंबई : संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा कडक निषेध नोंदवत याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज खासदार संभाजीराजे यांनी ट्विटरमधून केली आहे. Central, Karnataka government should take stringent action against the culprits; Demands Yuvraj MP Sambhaji Raje
कर्नाटकच्या बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बेंगलोरतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
बंगळुरू येथील घटनेचा युवराज खासदार संभाजीराजे यांनी कडक शब्दांत निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगलोर येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र तसेच कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App