विशेष प्रतिनिधी
पुणे : लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्या थेट कोथरूड कचरा डेपो येथील मेट्रो कार शेडवर लागल्या. या गोळ्या शेडमधून आत आल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Bullets fired from a gun during Army training hit a Metro shed directly, injuring a Metro employee
कोथरूडच्या जुन्या कचरा डेपोवर मेट्रोचे कार शेड आहे. याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूस लष्कराच्य जवानांचे प्रशिक्षण सुरू होते. काल संध्याकाळी मेट्रो शेडमध्ये काम करीत असताना पत्र्यावर अचानक गोळ्यांचा आवाज झाला. यातील काही गोळ्या पात्रता छेदून आतमध्ये आल्या.
यातील एक गोळी कर्मचाऱ्याला लागली आहे. अनजय कुमार (वय -२४, रा.बिहार) असे जखमीचे नाव आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ही गोळी एके 47 किंवा तत्सम रायफलची असावी असा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. लष्कराकडुन या घटनेबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. तसेच मेट्रोचे अधिकारीही याविषयावर बोलणे टाळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App