बुलडाणा : मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहारचे यश, तर भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा


जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या दोन्ही नगर पंचायतींमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही, तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता, तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. Buldana One-sided power to Congress in Motala, success of attack in Sangrampur, while BJP lost in both places


प्रतिनिधी

बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता आज 19 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या वतीने गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या दोन्ही नगर पंचायतींमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही, तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता, तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर संग्रामपूरमध्ये 17 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात होते. मोताळा नगर पंचायतीमध्ये 12 काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला याठिकाणी एकहाती सत्ता मिळाली आहे. तर भाजपला खातेही उघडता आले नसून सेनेला 4 जागा आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागलेय.

संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणक रिंगणात होते. या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला याठिकाणीही खाते उघडता आले नाहीय. दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, नाना पटोलेंसह इतर नेत्यांच्या सभा झाल्या होत्या, प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, आजच्या निकालाचे चित्र काही वेगळेच आहे.

Buldana One-sided power to Congress in Motala, success of attack in Sangrampur, while BJP lost in both places

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात