विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण येथील मलंगगडावर फिरायला गेलेल्या दोन मुले आणि दोन मुलींना रविवारी बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यावरून ही मारहाण झाली. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. Boys and girls at Malanggad Beating on clothes
मालंगगडावर फिरायला गेलेल्या मुला मुलींना तुम्ही तोकडे कपडे घातले असल्याचे सांगून 6 ते 8 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पण, कुणी कोणते कपडे घालायचे हे ठरविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. तसेच नेवाळी ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली नाही. तसेच त्यांच्यावर उपचारही पोलिसांनी केले नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी या गंभीर प्रकारची नोंद घ्यावी. पोलीस जनतेचे रक्षण करू शकत नसतील तर जनतेने स्व संरक्षणासाठी आता हत्यार बाळगण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अशा प्रकारची घटना औरंगाबाद येथेही घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याचे वृत्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App