विनायक ढेरे
नाशिक : एकीकडे पवार – काका पुतण्यांच्या ऐक्याची चर्चा; पण दुसरीकडे दोघांच्या निष्ठावंतांच्या पोटात गोळा!! अशी अवस्था दोन्ही राष्ट्रवादींमध्ये झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर दोनच महिन्यांच्या आत पवार काका – पुतणे एक येणार याची चर्चा पवार कुटुंबातूनच घडवायला सुरुवात झाली. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार आणि रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी पवार कुटुंबाच्या ऐक्यासाठी पुढाकार घेतल्याच्या बातम्या आल्या. कारण त्यांनी कशी वक्तव्य केली. या निमित्ताने महाराष्ट्रात काका – पुतणे एक होणार आणि भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाणार. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार. ठाकरे आणि काँग्रेस अडचणीत येणार, अशाही चर्चा झडल्या.
पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या राष्ट्रवादींमध्ये मात्र एक वेगळीच समस्या उभी राहिली. पवार काका – पुतणे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर दोघांच्याही कट्टर अनुयायांनी एकमेकांना ठोकण्याची संधी घेतली. राष्ट्रवादीच्या जुन्या गटबाजीच्या राजकारणाला नवे फुटीचे रूप दिले. दोन्ही दोघांच्याही कट्टर निष्ठावंतांनी आपापली जुनी उणीदुणी काढून घेतली. काका – पुतण्यांच्या दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्याने सर्व प्रकारच्या पद वाटपामध्ये आपल्याला संधी मिळण्याची आशा दोन्हीकडच्या निष्ठावंतांना तयार झाली.
पण तेवढ्यात काका – पुतण्यांच्या ऐक्याची चर्चा सुरू झाल्याने दोघांच्याही निष्ठावंतांची पंचाईत झाली. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही पंचाईत पहिल्यांदा उघड दिसली. खासदार सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या बैठकीत अजितदादांच्या निष्ठावंतांनी आपल्याला इथून पुढे पदांच्या वाटपात डावलण्यात येऊ नये. शरद पवारांची राष्ट्रवादी जरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन झाली, तरी अजित पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना पदे आणि तिकिटे वाटण्यामध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी अजितदादांच्या निष्ठावंतांनी केली. इथेच खरी शरद पवारांच्या निष्ठावंतांची गोची झाली.
विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
– तिकिटे उडण्याची निष्ठावंतांना भीती
येत्या दोन महिन्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तिथे दोन्हीकडच्या निष्ठावंतांना तिकिटांच्या मोठ्या आशा आहेत. जर पवार काका – पुतण्यांची राष्ट्रवादी एक झाली, तर तिकीट वाटपावर मूळात मर्यादा येणार आहेत. त्यामुळे पक्षाचे तिकीट खेचून घेण्यासाठी दोघांच्या निष्ठावंतांची स्पर्धा वाढणार आहे आणि म्हणूनच पवार – काका पुतणे एक होतील, पण आपले काय होईल??, याची चिंता आता दोघांच्याही निष्ठावंतांना लागली आहे. काका – पुतण्यांच्या ऐक्य प्रयत्नांमधून आपलेच तिकीट उडण्याची भीती निष्ठावंतांमध्ये निर्माण झाली आहे. या भीतीचे परिणाम लवकरच दोन्ही राष्ट्रवादींमध्ये दिसणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App