विशेष प्रतिनिधी
पुणे : Sunanda Pawar दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली तर ताकत वाढणार आहे, असे मत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Sunanda Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अजित पवार गटावर सातत्याने टीका करत असतात. मात्र त्यांच्या आईनेच दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची भूमिका व्यक्त केल्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 ते 25 डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात ‘भीमथडी जत्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या.
शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटूंबीयांची भेट ही राजकीय नसून कौटुंबिक भेट होती. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली ताकत वाढणार आहे. सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत. कुटूंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आम्ही सर्व आमदारांना निमंत्रण देत असतो, यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. शरद पवार दरवर्षी जत्रेला भेट देत असतात, यावर्षी पण देणार आहेत. महिला बचत गटाच्या पाच महिलांच्या हस्ते उदघाटन करण्याचा आमचा विचार आहे. मुंबईत भीमथडी जत्रा करण्याचे नियोजन आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App