Booster Dose: मुंबई महानगर पालिकेकडून १० जानेवारीपासून मिळणार बूस्टर डोस-जाणून घ्या नियमावली!


  • बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओमिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनापाठोपाठ ओमिक्रॉन रुग्णात (Omicron Patient) देखील वाढ होते आहे. त्यामुळे ओमिक्रॉनला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी भारतात सुद्धा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.Booster Dose: Booster Dose from Mumbai Municipal Corporation from January 10 – Know the Rules!



येत्या 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

बूस्टर डोससंदर्भातील पालिकेची नियमावली …

  • येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
  • आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील या सर्वांना दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असल्यास ते तिसऱ्या डोससाठी पात्र असतील.
  • ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • 60 वर्षांवरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.
  • या सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लस विनामूल्य देण्यात येणार आहे.
  • वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस मिळेल.
  • आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्धे ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे आणि ज्यांची कोविन ॲपवर नागरिक अशी वर्गवारी झाली आहे अशा लाभार्थ्यांना लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑनसाइट पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
  • कोरोना प्रतिबंधक ज्या लसीचे दोन डोस तुम्ही घेतले असतील तीच लस बूस्टर डोससाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच जर तुम्ही कोव्हॅक्सिन लसीचे पहिले दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच देण्यात येईल. त्याचप्रमाणे कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोस कोव्हिशिल्ड लसीचाच दिला जाईल.

Booster Dose : Booster Dose from Mumbai Municipal Corporation from January 10 – Know the Rules!

महत्त्वाच्या बातम्या

NEET PG Counselling : ओबीसी EWS विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा;पीजी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात