उबाठाचा प्रचार मुंबईत “जोरात”; बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा अमोल किर्तीकरांच्या प्रचारात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उबाठाचा प्रचार मुंबईत जोरात, बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात!!, असे चित्र आज उत्तर पश्चिम मुंबईत दिसले. महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी इक्बाल मुसा फिरताना दिसला. त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुरती अडचणीत आली. Bomb blast accused Iqbal Musa campaigning for Amol Kirtikar

मुंबईत महाविकास आघाडीच्या विशेषता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये मुस्लिम समाज आघाडीने सामील होत आहे अशाच एका प्रचाराच्या फेरीमध्ये अमोल कीर्तीकरांबरोबर 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी इक्बाल मुसा दिसला. या प्रचारफेरीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे व्हायरल झाले त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रचार पद्धतीवरच ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केली.

आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबरोबर बॉम्बस्फोट खटल्यातले आरोपी दिसले. ते मुसलमानांचे तुष्टीकरण करणारेच पक्ष आहेत. परंतु, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन प्रचार करणाऱ्या शिवसेनेच्या प्रचारात बॉम्बस्फोट घेतल्यातला आरोपी कसा काय दिसू शकतो??, याबद्दल स्वतः उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी वर उल्लेख केलेल्या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी केली

Bomb blast accused Iqbal Musa campaigning for Amol Kirtikar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात