समृद्धी महामार्गास “शापित” म्हणणाऱ्या संजय राऊतांना भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर!

Keshav Upadye and Sanjay Raut

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये अन् आमदार अतुल भातखळकरांनी साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसला भीषण अपघात होऊन, बसणे पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, शिवाय आठ प्रवासी जखमी झाले. या भयानक अपघाताच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळलेला असताना, आता या अपघाताच्या घटनेवरूनही काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अपघातानंतर सर्व सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागून जखमींच्या बचाव करीत असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र नेहमीप्रमाणे सरकारवर टीका करण्याच्यादृष्टीने एक विधान केलं, ज्यावरून ते पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा नॅरेटिव्ह पसरवत असल्याचे दिसत आहे. BJPs strong response to Sanjay Raut who called Samriddhi Highway cursed

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा “शापित” असल्याचा जावई शोध संजय राऊत यांनी लावला आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या त्या शेतकऱ्यांच्या शापामुळेच समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत, असे अंधश्रद्धा पसरवणारे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यावरून आता भाजपानेही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात, ‘’वंदनीय बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची होती. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा कार्यक्रम राबवला आहे. समृद्धी महामार्गावर झालेला अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा केवळ अपघात आहे, याचं कारण अजून समोर यायचं आहे. त्यामुळे वास्तविक, ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही.पण, संजय राऊत यांना सत्ताधाऱ्यांची कावीळ झाली असल्याने प्रत्येक गोष्ट पिवळी दिसत आहे.’’

याचबरोबर ‘’महामार्ग हे विकासाचे महत्वाचे साधन असते. यावर होणारे अपघात हे टळलेच पाहिजेत, या मताचे आम्हीही आहोत. पण अपघातावरून राजकारण करणाऱ्या राऊतांचा प्रयत्न म्हणजे मृतांच्या टाळुवरील लोणी खाण्यासारखाच आहे.’’ असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.

याशिवाय भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणतात, ‘’हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व मानत नाहीत, मात्र शाप, शापित अशा बकवास गोष्टींवर मात्र त्यांचा विश्वास आहे. समृद्धी महामार्गावर झालेला अपघात दुर्दैवी खरा, आमच्या मनात मृतांबद्दल हळहळ नक्कीच आहे. परंतु अपघात होत नाही, असा एक तरी रस्ता आहे का? तो महामार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखला जातो, यांचे भान तरी बाळगा.’’

BJPs strong response to Sanjay Raut who called Samriddhi Highway cursed

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात