…म्हणून भाजपा आणि महायुतीचं आजचं “आक्रोश आंदोलन” झालं स्थगित!

Shelar new

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बुलढाण्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे.  todays Akrosh Andolan of BJP and Mahayuti has been cancelled

आशिष शेलार यांनी ट्वीटद्वार सांगितले आहे की, ‘’बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्याही सहवेदना!   स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत.’’

याचबरोबर, ‘’ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजपा आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’’ असं शेलार यांनी सांगितलं आहे.

याशिवाय ‘’आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू.’’ असा इशाराही आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे दिला आहे.

बुलढाण्यानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन बसणे पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 8 प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातानंतर सर्व सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागून जखमींच्या बचाव करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा नॅरेटिव्ह पसरवत आहेत.

 todays Akrosh Andolan of BJP and Mahayuti has been cancelled

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात