”…हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे” भाजपाचा काँग्रेसवर घणाघात!

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा तो अर्धवट व्हिडीओ शेअर करून ट्रोल केल्याबद्दल दिले प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूरात पावसाने अक्षराशा थैमान घातलं आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. शहरातील अनेक रस्ते पूर्णपणे  जलमय झाले आहेत.  अशावेळी राज्य सरकारच्यावतीने नागरिकांच्या  मदतीसाठी  प्रयत्न सुरू आहेत. तर उपमुख्यमंत्री हे स्वत: नागपूरातील नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधून तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. BJPs strong response to Congresss criticism of Deputy Chief Minister Fadnavis

दरम्यान फडणीस नुकसानीची पाहणी करताना नागरिकांशी त्यांचा झालेला संवाद आणि त्यावेळी घडलेल्या एक प्रसंगाचा अर्धवट व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला. तसेच यावरून फडणवीसांवर टीका देखील केली. काँग्रेसच्या या टीकेला भाजपाने त्या प्रसंगाचा पुढचा व्हिडीओ शेअर करून जोरदार प्रत्युत्तर  दिले आहे.

पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत ? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार ? असा सवाल काँग्रेसने केला.

यावर भाजपाने पलटवार करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा! (गर्दीतून त्याला जवळ ओढल्याचा स्पष्ट व्हीडिओ आणि त्याच्या घरी प्रत्यक्ष भेट दिल्याचा व्हीडिओ सोबत जोडला आहे)

पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…!

BJPs strong response to Congresss criticism of Deputy Chief Minister Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात