गुजरातमध्ये पूल कोसळल्याने हाहाकार; ट्रकसह अनेक वाहने नदीत पडली, चार जण बेपत्ता

आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद  : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाला चुडाला जोडणारा पूल खचला आहे. ट्रकसह अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत दहा पेक्षा अधिक जण पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून, आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर चारजण अद्याप बेपत्ता असून बचाव आणि शोध कार्य सुरू आहे. Bridge collapses in Gujarat several vehicles fall into river, four missing

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वस्ताडी गावाजवळ हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गाला चुडाला जोडणारा पूल येथे बांधण्यात आला होता. जो आज तुटला आहे. त्यामुळे पुलावर उपस्थित असलेल्या ट्रक, मोटारसायकलसह अनेक वाहने नदीत पडली. त्यामुळे अनेक प्रवासीही पाण्यात पडले.

घटनेनंतर घटनास्थळी हाहाकार माजला. माहिती मिळताच गावचे सरपंच व इतर लोक घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी हजर आहेत.

Bridge collapses in Gujarat several vehicles fall into river four missing

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात