माध्यमांच्या अटकळी आणि विरोधकांचे मनसूबे यांना एकनाथ शिंदेंचा दरेगावातून सुरुंग; म्हणाले, भाजपचाच अंतिम निर्णय मान्य!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माध्यमांच्या अटकळी आणि विरोधकांचे मनसूबे यांना एकनाथ शिंदेंचा दरेगावातून सुरुंग; म्हणाले, भाजपचा अंतिम निर्णय मान्य!!

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ दरेगावला निघून गेल्यानंतर माध्यमांनी महायुतीत मतभेद होऊन तडे गेल्याच्या बातम्या चालविल्या होत्या. त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचे मनसूबे हळूहळू समोर येत होते भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले तर काही वेगळे करता येऊ शकते याच्या अटकळी देखील माध्यमे आणि विरोधकांनी बांधल्या होत्या. एकनाथ शिंदे दरेगावात पोहोचण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर त्यांना भेटायला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड गेले होते त्यातून माध्यमांनी पवार काही गेम टाकत असल्याचा निष्कर्ष काढला होता.

एकनाथ शिंदे दरेगावात पोचल्यानंतर त्यांना ताप आला त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर स्वतः एकनाथ शिंदे आज बाहेर आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत एकाच वेळी माध्यमांच्या अटकळी आणि विरोधकांचे मनसूबे यांना सुरुंग लावून टाकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत आणि मंत्रिमंडळाबाबत भाजपचे केंद्रीय नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल महाराष्ट्र हिताचा निर्णय आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करून टाकले. उपमुख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असली तरी ती माध्यमांमध्येच आहे या सर्व मुद्द्यांवर एकत्रित बसूनच निर्णय घेऊ, असा निर्वाळा त्यांनी दिला.

EVMs च्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरले असताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना ठोकून काढले. विरोधक जिंकले कीEVMs चांगले आणि ते हरले की EVMs वाईट, अशी दुटप्पी भूमिका कशी चालेल??, असा खोचक सवाल त्यांनी केला.

BJP’s final decision accepted said Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात