हा शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर भाजपच्या नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड, त्याची सर्वात मोठी यशस्वीता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण जाणे, पक्षाच्या नावालाही हादरा बसणे हा काही फक्त शिवसेना, राष्ट्रवादी अथवा फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर तो नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे आणि ती संधी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या राजकीय कृतीतूनच भाजपला आयती प्राप्त करून दिली आहे!! यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपला हातभार लागतो आहे.  BJP trying to bring in gujrat victory model in maharashtra, wants to contest 200 seats powerfully of assembly on lotus symbol

उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब चे कॉपी करून कारच्या रूफ टॉप वरून भाषण केले असले शिवसेना आणखी पुतण्यापासून ती किती वाचवू शकतील याविषयी शंकाच व्यक्त केले जात आहे शिवाय कोर्टातली कायदेशीर लढाई तर अजून दीर्घकाळ चालणारच आहे. ठाकरेंचे आणखी 4 खासदार आणि 10 आमदार फुटणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

पण असे असले तरी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गमावले ते ठाकरेंनी, पण सोशल मीडियावर मीम्स मात्र शरद पवार, अजितदादा, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर बनली. त्यामुळे शिवसेनेतल्या फुटी पासून चिन्ह जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी पवारच कसे जबाबदार आहेत, हेच जनमानसात ठसल्याचे दिसून येते आहे. त्यातूनच ही मीम्स तयार झाली आहेत.

पण हा मुद्दा देखील अंतिम नाही, तर मधला आहे. किंबहुना मोठ्या राजकीय व्युहरचनेतला तो एक छोटा घटक आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला 2019 मध्ये धक्का देऊन एक प्रकारे विचार मंथन करायला भाग पाडले. भाजप कायमच छोटा किंवा मोठा भाऊ अशा स्थितीत राहणार असेल, तर भाजपच्या मूलभूत विस्ताराला कायमच मर्यादा पडतील. भले आज भाजप मोठा भाऊ असला तरी मोठ्या भावाच्या राजकीय विस्ताराला 150 – 175 विधानसभांच्या जागांची मर्यादा पडणार हे उघड गुपित भाजपने व्यवस्थित ओळखले. आणि त्यातूनच 2019 च्या धक्क्यातून कायमची बाहेर येण्याची व्युहरचना भाजपने रचत एकनाथ शिंदे यांचे बंड घडविले आहे.



भाजपची ही नवी राजकीय व्युहरचना थेट पक्ष संघटनेच्या विस्ताराशी जोडली असून विधानसभेच्या किमान 200 जागा आणि मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा, महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये सत्ता म्हणजे पूर्ण बहुमत अशाच आशयाची आहे. भाजपला या व्युहरचनेतून 1990 पूर्वीच्या अखंड काँग्रेसची राजकीय ताकद मिळवायची आहे. काँग्रेस अखंड असताना विधानसभेच्या 288 पैकी जवळपास 260 ते 270 जागांवर हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावर उमेदवार उभे करीत असे. उरलेल्या 15 – 20 किंवा जास्तीत जास्त 20 – 25 जागा मित्र पक्षांना वाटत असे. याचा अर्थ काँग्रेसचा काँग्रेसची राजकीय ताकद महाराष्ट्र 260 ते 70 जागी हाताच्या पंजा या चिन्हावर स्वतःचे उमेदवार उभे करण्याची असे.

भाजपला त्याच अर्थाने जुनी काँग्रेस व्हायचे आहे. भाजपची राजकीय महत्त्वाकांक्षा शतप्रतिशत भाजप म्हणजे जुन्या काँग्रेस सारखी राजकीय विस्ताराची आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर यशस्वी झाल्यानंतर त्या शक्यतेच्या जवळ भाजप पोहोचत आहे. विधानसभा निवडणुका केव्हाही होवोत. भाजपला आता शिंदे गटाबरोबर युती करून तब्बल 200 जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार उभे करायचे आहेत. शिंदे गटाला 88 जागा दिल्या तरी त्यांना चालणार आहे. त्यामुळे भाजपचा विस्तार निवडणुकीच्या यशस्वीतेच्या दृष्टीने देखील पूर्ण बहुमताचा म्हणजे 145 अधिक असा राहणार असून भाजपला स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे.

हा फक्त 1, 2, 3 असा नंबर गेम नसून भाजपला निवडणुकीचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात आणायचे आहे. गुजरात मध्ये भाजपने काँग्रेस पक्षाशी 2017 साली निर्माण झालेली स्पर्धा 2022 मध्ये पूर्ण संपवली, त्या प्रमाणातले यश भाजपला महाराष्ट्रात मिळवायचे आहे. गुजरात मध्ये भाजप 154 आणि काँग्रेस 21 अशी आमदार संख्या आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांना मिळून डबल डिजिटमध्ये त्यांना रोखायचे आहे.

हे आव्हान भाजपसाठी सोपे नाही. भाजपने 2014 मध्ये 124 जागा जिंकत आपण शंभरी गाठू शकतो हे सिद्ध केले होते. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची युती करून भाजपला 105 जागांवर समाधान मानावे लागले होते. पण तरी भाजपने शंभरी गाठलीच होती. काँग्रेस नंतर शंभरी गाठणारा भाजप एकमेव पक्ष ठरला आहे. याचा अर्थ असा की भाजप जर 124 जागा कमळ चिन्हावर जिंकू शकतो, तर 200 जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी भाजपला निवडून येण्याची क्षमता असणारे आणखी तब्बल 75 उमेदवार मिळवायचे आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना विद्यमान 40 आमदार टिकवून उरलेले 48 विजयाची क्षमता असणारे उमेदवार मिळवून द्यायचे आहेत.

भाजप आणि शिंदे गट यांच्यापुढे ही मोठी संख्यात्मक आव्हाने आहेत आणि ही संख्यात्मक आव्हाने पूर्ण करण्यासाठीच या दोन्ही पक्षांची व्युहरचना केली आहे. ही व्युहरचना करताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांच्यातील फाटाफूट अटळ आहे.

परसेप्शनच्या पातळीवर उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा नाना पटोले कितीही बोलत असतील, मराठी माध्यमे त्यांना स्पॉन्सर्ड प्रसिद्धी देत असतील, तरी या तीनही नेत्यांच्या पक्ष वाढीला फारच मर्यादा आहेत. पक्ष विस्ताराच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा देखील फार तोकड्या आहेत. त्या तुलनेत भाजपची शक्ती, सर्व प्रकारचे रिसोर्सेस आणि महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाकांक्षा अफाट आहे. यातील काही शक्ती आणि रिसोर्सेस भाजप काही प्रमाणात शिंदे गटाला पुरवित आहे. त्यामुळेच एक प्रकारे ही विषम लढाई आहे आणि ती फक्त शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेस यांच्या फोडाफोडीची नसून भाजपच्या राजकीय भौगोलिक विस्ताराच्या व्यूहरचनेची आहे!!

भाजपला कोणत्याही स्थितीत निवडून येण्याची मोठी क्षमता असणारे 200 उमेदवार उभे करायचे आहेत आणि उरलेल्या 88 जागांवर शिंदे गटाला शक्ती पुरवून त्यांनाही बरोबर घ्यायचे आहे. भाजपसाठी हे आव्हान आणि त्यासाठीचा मेगा प्लॅन तयार आहे… अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत!!

BJP trying to bring in gujrat victory model in maharashtra, wants to contest 200 seats powerfully of assembly on lotus symbol

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात