वृत्तसंस्था
उज्जैन : महाशिवरात्रीनिमित्त उज्जैनमधील शिव ज्योती अर्पणम कार्यक्रमात क्षिप्रा नदीच्या काठावर एकाच वेळी 21 लाख दिवे प्रज्वलित करून विश्वविक्रम झाला आहे. यासाठी 52 हजार लिटर तेल, 25 लाख कापसाच्या वाती, 600 किलो कापूर आणि 4 हजार माचिसच्या पेट्या मागवण्यात आल्या. अयोध्येत आतापर्यंत 15.76 लाख दिवे लावण्याचा विक्रम आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट आहे. 21 lakh Divyani Ujalla Kshipra Ghat in Hakalachya Ujjain
महाकाल मंदिराचे दरवाजे एक तास आधी पहाटे 3.00 वाजता उघडण्यात आले. हे दरवाजे शक्यतो पहाटे 4.00 वाजता उघडतात. दरवाजे उघडल्यानंतर पहाटे 4.00 ते 5.00 या वेळेत महापूजा झाली.
महाकालची भस्म आरती वर्षातून एकदा दुपारी 12 वाजता
शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला सकाळी 11.00 वाजता महाकालाचा फेटा उतरवला जाईल. त्यांचे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवून सील केले जातील. दुपारी 12.00 वाजल्यापासून भस्म आरती होईल, जी दिवसा वर्षातून एकदाच होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App