प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये आधी भाजपशी युती करून विधानसभेत 45 आमदार, लोकसभेत 16 खासदार आणि राज्यसभेत 5 खासदार निवडून आणलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपशी नाते तोडून राष्ट्रीय जनता दलाशी संधान साधल्याबरोबर आपली वेगळी महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 100 जागांच्या आत गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा नितीश कुमार यांनी बोलून दाखवली आहे, पण ती काँग्रेसच्या बळावर!! Nitish Kumar declared his ambition to restrict BJP within 100 seats in loksabha election 2024
बिहारची राजधानी पाटण्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एम. एल. च्या अधिवेशनात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना निमंत्रित करण्यात आले होते. या अधिवेशनात दोघांची भाषणे झाली. या भाषणातूनच नितीश कुमार यांनी भाजपला 100 जागांच्या आत गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.
या अधिवेशनाला काँग्रेस तर्फे सलमान उपस्थित होते. त्यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले, की काँग्रेस सह आपण सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आपण 100 जागांच्या आत गुंडाळू शकू. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. त्याआधी तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्याच नेत्यांना एक वेगळी सूचना केली. तेजस्वी यादव म्हणाले, की काँग्रेसने आता देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणुकीत ड्रायव्हर सीटवर बसण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे आपण भाजपचा पराभव करू शकू आणि तेजस्वी यादव यांच्या भाषणानंतर नितेश कुमार यांनी देखील काँग्रेसलाच पुढाकार घ्यायचे आवाहन करून भाजपला 100 जागांच्या आज गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा जाहीर बोलून दाखवली.
या दोन्ही नेत्यांना उत्तर देताना सलमान खुर्शीद यांनी आपण वकील असल्याचा निर्वाळा देत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची वकील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करण्याची ग्वाही दिली.
नितीश कुमार यांनी मत व्यक्त केलेली महत्त्वाकांक्षा किती फुलद्रूप होते? त्यासाठी काँग्रेसचे नेते सर्व प्रादेशिक पक्षांना किती साथ देतात? आणि प्रादेशिक पक्ष देखील काँग्रेस नेत्यांचे किती ऐकतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App