प्रतिनिधी
मुंबई : महा विकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधली मंत्री आणि नेते फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत. ते आपल्याच मुलांना आमदार-खासदार करणार, मग बाकीच्या बहुजन समाजाने काय फक्त सतरंज्या उचलायचा का…??, असा परखड सवाल भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.BJP MLC Gopichand Padalkar targets Thackeray – Pawar government over recruitment issues
बैलगाडा शर्यत असो, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असो किंवा एमपीएससी मधील पदभरतीचा प्रश्न असो, गोपीचंद पडळकर यांनी बेधडकपणे ठाकरे – पवार सरकारवर टीका केली आहे. आरोग्य विभागातील पदभरतीच्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच ठाकरे – पवार सरकार टीकेचे धनी होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पडळकर यांनी एमपीएससीतील पदभरतीवरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. यावेळी बहुजन समाजातील मुलांनी फक्त यांच्या सतरंज्याच उचलाव्यात, अशी या सरकारची मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाकरे – पवार सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या. आता तर वेगवेगळ्या २० विभागांत जवळपास ११ हजार ३५१ पदे रिक्त असताना, फक्त ४ हजार २६४ रिक्त पदांवरच भरती करावी, अशी मागणी सरकारने लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
यापेक्षा कहर म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणींतील २ हजार ५०० च्या आसपास पदे रिक्त असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुठल्याही पदभरतीची सरकारकडे मागणी केली नाही. हीच परिस्थिती अनके खात्यांची आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?
प्रशासन – सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यासाठी या प्रस्थापितांकडे रिक्त जागा आहेत. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे, असा गंभीर आरोपही पडळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App