विश्वविख्यातांच्या तोंडाचा पट्टा, पक्षात “अंधार(रे)” दाटता… असंही शेलारांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेनेत(शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर भाजपा नेत्यांकडून ठाकरे गटास टोला लगावला जात आहे. शिवाय, संजय राऊतांवरही निशाणा साधला गेला आहे. BJP MLA Ashish Shelar criticizes Thackeray group and Sanjay Raut
‘’सुषमाताईंची संवाद यात्रा, विश्वविख्यातांच्या तोंडाचा पट्टा, पक्षात “अंधार(रे)” दाटता. शेवटी राहिलेल्या निलमताई पण सोडून गेल्या आता काय ओवेसींना बोलावून नेता करता?’’ असं भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत.
याशिवाय, ‘’मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!, अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात पसरवणारे एकच ते महान “विश्वविख्यात” हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला आता भोगा आपल्या कर्माची फळं!’’ असंही या अगोदर आशिष शेलार यांनी म्हणत ठाकरे गट आणि संजय राऊतांवर निशाणा साधला होता.
महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App