‘’KCR सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार’’ असंही मोदींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
वारंगल : तेलंगणातील वारंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’आज मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून वारंगलमध्ये तुमच्या सर्वांमध्ये आलो आहे. हा परिसर जनसंघाच्या काळापासून आपल्या विचारसरणीचा मजबूत बालेकिल्ला आहे. भाजपचा उद्देश आहे – तेलंगणाचा विकास झाला पाहिजे, तेलंगणाने भारत विकसित केला पाहिजे. गेल्या ९ वर्षात संपूर्ण जगात देशाचा मान वाढला आहे, भारताबद्दल आकर्षण वाढले आहे. याचा फायदा तेलंगणालाही झाला आहे. पूर्वीपेक्षा आता येथे जास्त गुंतवणूक येत आहे आणि तेलंगणातील तरुणांना याचा फायदा होत आहे, त्यांना नोकऱ्या मिळत आहेत.’’ First time corruption deal between two political parties Modi targets BRS and AAP in Telangana
तेलंगणाच्या सध्याच्या सरकारवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, “तेलंगणा सरकारने फक्त चार गोष्टी केल्या आहेत – पहिली, मोदी आणि केंद्र सरकारला सकाळ, संध्याकाळ शिव्या देणे. दुसरी म्हणजे, एका कुटुंबाला सत्तेचे केंद्र बनवणे आणि स्वतःला तेलंगणाचे मालक सिद्ध करणे, तिसरी तेलंगणाचा आर्थिक विकास नष्ट करणे आणि चौथी तेलंगणाला भ्रष्टाचारात बुडवणे.
Speaking at launch of development initiatives in Warangal. The projects will significantly benefit the people of Telangana. https://t.co/NEWqkmH4uC — Narendra Modi (@narendramodi) July 8, 2023
Speaking at launch of development initiatives in Warangal. The projects will significantly benefit the people of Telangana. https://t.co/NEWqkmH4uC
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2023
याशिवाय KCR सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, किंबहुना त्यांचा भ्रष्टाचार दिल्लीपर्यंत पसरला आहे. तसेच, आपण अगोदर दोन राज्ये किंवा दोन देशांच्या सरकारमधील विकासाशी निगडीत करारांच्या बातम्या पाहायचो. मात्र हे पहिल्यांदाच होत आहे की, दोन राजकीय पक्ष आणि दोन सरकार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या ‘डील’चे आरोप झाले आहेत. असंही मोदींनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more