विशेष प्रतिनिधी
मुंबई :nawab malik शिंदे – फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी स्वतःला बारामतीतूनच पक्षाचे तिकीट घेतले. अजितदादांच्या यादीमध्ये आश्चर्यकारक असे काही नाही. कारण सगळ्या विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचा निर्णय अजितदादांनी घेतला होता, तो त्यांनी अंमलात आणला. पण या यादीत नवाब मलिकांचे मात्र नाव नाही. कारण नवाब मलिकांना भाजपचा स्पष्ट विरोध आहे.Ajit pawar
दाऊद इब्राहिमशी मनी लॉन्ड्रीग करून जमीन हडपण्याच्या प्रकरणात 11 महिन्यांचा तुरुंगवास काढल्यानंतर नवाब मलिक यांना वैद्यकीय करण्यासाठी जामीन मंजूर झाला त्यानंतर ते नागपूरच्या अधिवेशनाला गेले. त्यावेळी ते विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूला सत्ताधारी बाकांवर बसले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब आक्षेप घेऊन अजित पवार यांना जाहीर पत्र लिहिले. त्यामुळे नवाब मलिकांची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची गोची झाली. नवाब मलिक उरलेल्या अधिवेशन काळात सभागृहात गेले नाहीत. त्यानंतर नवाब मलिकांचे राजकीय कार्ड पुन्हा “डी ऍक्टिव्हेट” झाले.
तरी देखील अजितदादांचे नवाब मलिक प्रेम लपून राहिले नाही. ते नवाब मलिकांना घरी जाऊन भेटून पण आले. परंतु राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत मात्र नवाब मलिकांचे नाव सामील झालेले नाही. याचा अर्थ भाजपचा त्यांना असलेला विरोध अद्याप मावळलेला नाही, असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App