विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक आरोपांची मालिका सुरू करणाऱ्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केलं. नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉण्डरिंगचा आरोप करत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जावी अशी मागणी केली होती. या संदर्भामध्ये आज ते कोल्हापूरला भेट देण्यासाठी जाणार होते. पण हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्याविरूध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे ठरवले आहे.
Bjp leaders condemn kirit somaiya’s detention, Kirit somaiya had to cancel his kolhapur tour due to detention
मुश्रीफ समर्थक कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज आणि मुरगूड भागामध्ये कोर्टात जमा करण्यासाठीचा निधी जमवण्यास सुरूवातहु केली आहे. त्यामुळे अश्या वातावरण आधीच संवेदनशील झालेले असताना किरीट सोमय्या यांच्या कागद येथील भेटीनंतर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि त्याचमुळे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्ध केले होते. मात्र पोलिसांनी कारवाई केल्यामुळे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा, निधी उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली सुरुवात
ही ठाकरे सरकारची गुंडगिरी असून पोलिसांची दडपशाही सुरू आहे. माझ्या राहत्या घरी पोलिसांनी गर्दी केली. माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबून टाकण्यासाठी, मुलुंडला माझ्या घरातून मला अटक करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते असाही आरोप सोमय्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
सोमय्या यांना स्थानबद्ध केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर शंभर पोलिसांनी वेढा दिला आहे. या सरकारच्या काळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरताना दिसून येतात. पण सरकारविरूध्द बोलणाऱ्याच आवाज मात्र दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. अशा तीव्र शब्दांमध्ये भाजप नेत्यांनी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App